DIWALI ANK 2022 (MMGJ)

DIWALI ANK 2022
DIWALI ANK 2022 (MMGJ)

INR 100

Buy Now
MAZA ANAND

माझा आनंद - प्रसाद ओक
MAZA ANAND

by PRASAD OAK

INR 250

Buy Now
MAHARASHTRATEEL MAHABAND

ते ११ दिवस : महाराष्ट्रातील महाबंड
MAHARASHTRATEEL MAHABAND

  • Translators : DR. SHUCHITA NANDAPURKAR-PHADKE
  • INR 250

    Buy Now

    Testimonials

    MUKESH JADHAV

    शंकर पाटील असे लेखक आहेत ज्यांनी मराठी कथालेखनाला एका वेगळ्या उचीवर नेऊन ठेवले. आज पुन्हा एकदा वळी वाचायला सुरवात केली आहे. आणि पुन्हा एकदा इल्लम, धिंड, वावरी शेंग, बंधारा ही सगळी पुस्तक वाचायची आहेत. शंकर पाटलांनी लिहिलेली टारफुला कादंबरी वाचताना लक्षात येत की एखदी व्यक्तिरेखा रंगवताना किती बारिकाईने लक्ष दिल गेलं असेल. वाचकांच्या डोळ्यासमोर एखादं गाव, एखादं जनावर, नदी, ओढा, पारावरची निवांत बसलेली माणसं अगदी हुबेहुब रंगवलेली दिसतात. कथानकाचा आपणही एक भाग आहोत, आपल्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडते आहे असा भास निर्माण होत राहतो. शकर पाटील एक भन्नाट लेखक होते. वाचकांना एक वेगळा अनुभव देणारा लेखक म्हणजे शंकर पाटील. ...Read more

    ABOUT MAHADEO MORE

    महादेव मोरे पुणे-बंगलोर महामार्गावर असलेल्या निपाणी गावातील सटवाई गल्लीतल्या पिठाच्या गिरणीत तुम्ी गेलात तर पिठाच्या पांढ-याफटक लेपाने माखलेला एक माणूस तुमच्यासमोर येईल. या माणसाने भन्नाट कथा लिहिल्या आहेत, १५ कथासंग्रह आणि १८ कादंब-या त्याच्या नावावर आहेत, हे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणा-याला मूर्खात काढाल. पण हे खरे आहे आणि त्याहून अधिक खरे हे आहे की हे सगळेच्या सगळे साहित्य बावनकशी आहे. मराठी वाङ्मयाला फार पुढे नेणारे आहे. मुंबई-पुण्याकडच्या पांढरपेशा, उच्चभ्रू माणसांच्या गावीही नसलेल्या या माणसाचा पत्ता काही रत्नपारख्यांना मात्र पक्का ठाऊक होता. त्यांनी या माणसाला थेट निपाणीहून शोधून आणला आणि नुकत्याच माहीमच्या `यशवंत नाट्य मंदिरा`त पार पडलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य गौरव पुरस्कारांमध्ये त्याला ५० हजार रुपयांचा विशेष पुरस्कारही दिला. या माणसाचे नाव महादेव मोरे. महादेव मोरे पुरस्कार घ्यायला समोर आले तेव्हा झालेला टाळ्यांचा गजर थांबता थांबतच नव्हता. सत्तरीचे, पाठीत किंचित वाकलेले, पिकल्या केसांचे मोरे हे त्या दिवसाचे हीरो होते. गरिबीमुळे कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून पोटापाण्याच्या व्यवसायाला लागलेल्या मोरेंनी पहिली काही वषेर् शेतमजुरी केली. नंतरची ७-८ वषेर् गॅरेज व्यवसाय भागीदारीत करून पाहिला. त्यात नुकसान सोसले. नंतर स्वत:चे स्वतंत्र गॅरेज सुरू केले, त्यातही खोट आली. शेवटी पिठाची गिरणी सुरू केली. ती ते आजतागायत सांभाळत आहेत. गिरणीत १२-१२ तास उभे राहून काम करीत आहेत. त्यांचे लेखन या गिरणीतल्या बाकड्यांवरच चाले. त्यांच्या लेखणीने मात्र भल्याभल्यांना चाट पाडणारे समृद्ध अनुभवविश्व उभे केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांतून गॅरेज संस्कृतीतले ड्रायव्हर, क्लिनर, त्यांना नाडणारे पोलिस, आरटीओवाले, तंबाखूच्या वखारीतल्या स्त्रिया, वेश्या, दलाल, नायकिणी, त्यांचे पंटर, गुंड, देवदासी, टॅक्सी ड्रायव्हर, मिस्त्री, हॉटेलमालक, टेबले पुसणारी पोरे, मांग, गारुडी असे कितीतरी पात्रे त्यांच्या कथेची विषय आहेत. (साभार- वाचनवेडा, फेसबुक पेज) ...Read more

    PRADEEP GAWANDE READER

    महाराष्ट्रात जे काही मोजकेच पण दर्जेदार प्रकाशक आहेत. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसचा नंबर फार वर आहे. ारण आजपर्यंत आपल्या प्रकाशनाच्या बॅनरखाली अनेक दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके आम्हा वाचकापर्यंत पोहोचली आहेत. अक्षरांचा सुयोग्य आकार व टाईप व्याकरणदृष्ट्या अचुक लेखन, पुस्तकासाठी वापरात असलेला कागदाचा दर्जा हा नेहमीच सर्वोत्कृष्ट. पुस्तकामध्ये संदर्भानुसार मोजकेच, पण आवश्यक चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांची मजबूत बांधणी. ही आणि अशी अनेक गुणवैशिष्ट्ये धारण करणारी आपल्या प्रकाशनाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्राच्या वैयक्तिक, सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयापासून तमाम पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या कपाटाची शोभा म्हणजे मेहता प्रकाशनाची पुस्तकं. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहत आलो आहे. ...Read more

    PRAVIN JADHAV READER

    आपण मराठी वाचकांसाठी खूप छान काम करत आहात.दर्जेदार जागतिक स्तरावरची पुस्तके आपण मराठीत अनुवाद करून गरामीण भागातील आम्हा शेतकरीपुत्रा साठी वाचनासाठी वरदान ठरत आहे.मी एक विद्यार्थी आहे. बिजनेस आणि मॅनेजमेंट यावरची इंग्लिशपुस्तके आपण मराठीत उपलब्ध करून देत आहात.त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ...Read more

    J.K.SONAVANE READER

    आज आनंद यादव सर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी लिहिलेली झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल हा आत्मचरित्रंचा संच माझ्याकडे आहे. मी नेहमी या आत्मचरित्रांचे वाचन करतो. त्यामुळे सर आजही आपल्यामध्ये आहेत. ते आपल्या बरोबर बोलतात असा भास होतो. या सगळ्याचे श्रेय आपणाकडे जाते. आपण ही पुस्तके प्रकाशित करून वाचकांवर फार मोठे उपकार केले आहेत. तुम्ही ‘झोंबी’चे पालन-पोषण करणारे प्रकाशक आहात हेच खरे. साहित्याच्या समुद्रातील मोती काढून ते जगाला दाखविण्याचे मोठे कार्य आपण केलेले आहे. याबद्दल मी आपला आभारी आहे. – जे. के. सोनावणे,पुणे ...Read more

    ABHISHEK WAGHMARE READER

    I HAVE BEEN A GREAT ADMIRER OF YOUR PRESTIGIOUS MEHTA PUBLISHING HOUSE SINCE CHILDHOOD. YOU HAVE DON AN IMPORTANT JOB OF BRINGING FOREIGN LITERATURE IN TO MARATHI. I AM PARTICULARLY IMPRESSED BY YOUR ACTIVE PUBLISHING ON KINDLE WHEN OTHER CONVENTIONAL MARATHI PUBLISHERS ARE RELUCTANT TO MOVE TO DIGITAL DOMAIN. I SEE THIS COVID 19 LOCKDOWN AS AN OPPORTUNITY TO SHIFT TO DIGITAL PLATFORM. ...Read more